'चल भावा सिटीत' विजेते ऋषिकेश चव्हाण आणि श्रुती रावळ यांचा इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सत्कार
झी मराठी वाहिनीवरील ‘चल भावा सिटीत’ या लोकप्रिय कार्यक्रमात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या इचलकरंजीच्या ऋषिकेश चव्हाण आणि श्रुती रावळ या विजेत्या कलाकारांचा इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. महानगरपालिका कर्मचारी युवराज चव्हाण यांचे सुपुत्र ऋषिकेश चव्हाण आणि श्रुती रावळ यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि विनोदी सादरीकरणाच्या जोरावर हा बहुमान मिळवला. त्यांच्या या यशाबद्दल आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सहा आयुक्त विजय राजापुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, सहा आयुक्त रोशनी गोडे, अमृत भोसले, मनोज हिंगमिरे, जहांगीर पटेकरी यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सत्कारामुळे कलाकारांच्या उत्साहात भर पडली असून, त्यांच्या यशाचे कौतुक संपूर्ण शहरात होत आहे.