अरुण विद्या मंदिरमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा – ६० नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत, खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप
अरुण विद्या मंदिर, इचलकरंजी या प्राथमिक शाळेत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत इयत्ता १ लीमध्ये नव्याने दाखल झालेल्या ६० विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने उत्साहात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोकराव स्वामी होते. त्यांनी सर्व पालकांचे स्वागत करून नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, शैक्षणिक साहित्य आणि खाऊ यांचे वाटप केले. मुलांच्या मनोरंजनासाठी विशेष आकर्षण ठरले ते रिब स्टार श्री. बसवराज टकळगी यांचे 'मोटू-पतलू' वेशभूषेतील सादरीकरण. त्यांनी मुलांचे भरपूर मनोरंजन केले आणि वातावरणात आनंदाची लहर निर्माण केली. याप्रसंगी नगरपरिषदेचे अधिकारी श्री. योगेश कोंडेकर, संस्थेचे सेक्रेटरी श्री. संग्राम स्वामी, श्री. सुनील तोडकर, श्री. चंद्रकांत बडने उपस्थित होते. त्यांनी नव्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय कोठी सर यांनी शाळेच्या शैक्षणिक आणि उपक्रमात्मक कार्याची माहिती उपस्थित पालकांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आसिफ वाटे सर यांनी केले तर श्री. प्रशांत गुरव यांनी आभार मानले. या प्रसंगी इ. १ ली ते ४ थीचे सर्व शिक्षक व अनेक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात आनंदाचे वातावरण निर्मान झाले होते.