मथुरा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.श्रीकांत चव्हाण सर यांना सन २०२५ चा 'राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार' जाहीर
मथुरा शिक्षण संस्था संचलित मथुरा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.श्रीकांत गजानन चव्हाण यांची सन २०२५ चा 'राजर्षी शाहू आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कारसाठी निवड करण्यात आली आहे. शाहू छत्रपती फाउंडेशन, कोल्हापूर या संस्थेच्यावतीने शिक्षण, सामाजिक जागरूकता आणि शाहू महाराजांच्या विचारांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या शिक्षकांच्या गौरवासाठी हा पुरस्कार दिला जातो. श्री.चव्हाण सर यांचे शिक्षण क्षेत्रातील निस्सीम कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीचे योगदान आणि सामाजिक बांधिलकी यामुळे निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड जाहीर केली आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा रविवार २९ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता, राजर्षी शाहू स्मारक, दसरा चौक, कोल्हापूर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारामध्ये कोल्हापुरी फेटा, मानपत्र, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र यांचा समावेश असणार आहे. या सन्मानाबद्दल श्री.श्रीकांत चव्हाण सर यांचे मथुरा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हिंदुराव शेळके, कार्यवाह विवेक शेळके, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनलचे संपादक पत्रकार विजय तोडकर यांच्यासह शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी पालक आदिंसह सर्वत्र स्थरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.