महानगरपालिकेच्यावतीने वडांच्या रोपांचे वृक्षारोपण
महानगरपालिका वर्धापन दिन आणि वटपौर्णिमेचे औचित्य साधून इचलकरंजी महानगरपालिकेच्यावतीने शहीद भगतसिंग उद्यान आणि अलायन्स हॉस्पिटल परिसरातील रस्त्यांच्या बाजुला आणि कोले मळा येथे महिलांच्या हस्ते वडांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान, पर्यावरणाचे संवर्धनासाठी तसेच इचलकरंजी स्वच्छ, सुंदर आणि हरीत करणेसाठी सहकार्य करावे असे आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी आवाहन केले आहे. शहीद भगतसिंग उद्यान, अलायन्स हॉस्पिटल परिसरात तसेच कोले मळा येथे आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्डेकर, माजी नगरसेविका धृवती दळवाई, संगिता आलासे, बिल्कीस मुजावर, मारवाडी युवा मंच अध्यक्ष अनिता जैन, सेक्रेटरी श्वेता जैन, खजानीस सरीता तिवारी, सदस्य अनुराधा काबरा, सहा. आयुक्त विजय राजापुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, सहा आयुक्त रोशनी गोडे, संगिता हुग्गे यांच्यासह उपस्थित महिलांच्या हस्ते ५० वडांच्या तसेच १०० इतर देशी प्रजातीच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी सभापती राजु बोंद्रे, दिपक सुर्वे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, खरेदी अधीक्षक सुजाता दाभोळे, महिला बाल कल्याण अधिकारी बेबी नदाफ, शुभांगी जोशी, सहा.क्रीडा अधिकारी संजय कांबळे, सुनील बेलेकर, महिला बचत गटाच्या प्रतिनिधी सुनिता जाधव यांच्या सह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.