नामदेव क्षत्रिय महासंघ हातकणंगले तालुकाध्यक्षपदी अमित काकडे, उपाध्यक्षपदी निलेश पिसे

नामदेव क्षत्रिय महासंघ हातकणंगले तालुकाध्यक्षपदी अमित काकडे, उपाध्यक्षपदी निलेश पिसे

कोरोची येथील पत्रकार व श्री संत नामदेव शिंपी समाज कबनूर, कोरोची, चंदुर युवा अध्यक्ष अमित काकडे यांची अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ, नवी दिल्ली, महाराष्ट्र शाखा अंतर्गत हातकणंगले तालुका अध्यक्षपदी तर तालुका उपाध्यक्षपदी निलेश पिसे यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ, नवी दिल्ली, महाराष्ट्र शाखा अंतर्गत कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी स्थापन करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.भास्करराव टोम्पे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.श्री.ईश्वरजी धिरडे तसेच राष्ट्रीय समन्वयक श्री.अनंत जांगजोड कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री सुरेश विठ्ठलपंत पुकाळे यांच्या मध्ये झालेल्या बैठकीमध्ये हातकणंगले तालुका अध्यक्षपदी श्री अमित काकडे (इचलकरंजी) यांचीनिवड करणेत आली.तसेच हातकणंगले तालुका उपाध्यक्षपदी श्री निलेश पिसे (इचलकरंजी) यांची निवड करणेत आली.यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री.दिनकररावजी पतंगे, पश्चिम महाराष्ट्र मुख्य संघटक श्री.संतोष मुळे व सांगली जिल्हा अध्यक्ष श्री.उदय मुळे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री.भारत कोळेकर, शिरोळ तालुका अध्यक्ष शुक्राचार्य ऊरुणकर,श्री अजय मिरजकर (शिरोळ तालुका उपाध्यक्ष), शिरोळ तालुका सेक्रेटरी दत्ता पोरे, कार्याध्यक्ष अजय पुकाळे, जयसिंगपूर शहर उपाध्यक्ष आशिष उंडाळे, कार्याध्यक्ष नंदकुमार उरुणकर, सहकार्याध्यक्ष संतोष हावळ, चंद्रकांत पिसे आदित्य पुकाळे, पियुष पुकाळे,श्रीपाद पतंगे, अमित आंबेकर धीरज काकडे उपस्थित होते. यांच्या या निवडीने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post