समाजसेवक नरसू शिंदे यांनी स्वखर्चाने हजारोंच्यावर कुटुंबाला घालून दिला लघू व्यवसाय

समाजसेवक नरसू शिंदे यांनी स्वखर्चाने हजारोंच्यावर कुटुंबाला घालून दिला लघू व्यवसाय

समाजसेवक नरसु शिंदे यांनी समाजातील वंचित घटकातील लोकांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणून स्वखर्चाने अनेक लघू व्यवसाय घालून दिली आहेत. खेड्यातील अनेक तरुण बेरोजगार होवून फिरत आहे. व्यसनाधीन होत आहेत त्यामुळे समस्या वाढत चालली आहे. सामान्य कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधरावी म्हणून संजय लोखंडे सारख्या अनेक तरुणांना समाजसेवक नरसु शिंदे यांनी दुकाने घालून दिलेली आहेत. तर गावातील व परिसरातील अनेक महिलांना गावरान कुकुट पालन व्यवसाय काढून दिला आहे. यातील दोन व्यावसायांचे उद्घाटन प्राचार्य सुरेश बूगडे व डॉक्टर खवरे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी सुरेश गवळी, भिकाजी गोंधळी, आनंदा सूतार, अभिजीत कुंभार, संजय पाटील, अण्णा सुतार, संतोष सुतार, महादेव होडगे, चंद्रकांत सपकाळ आदींसह गावातील गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post