आचार्य अकॅडेमी मध्ये दहावी बोर्ड परीक्षे करिता तज्ञ मार्गदर्शन

आचार्य अकॅडेमी मध्ये दहावी बोर्ड परीक्षे करिता तज्ञ मार्गदर्शन

आचार्य फौंडेशन च्या आचार्य अकॅडेमी मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शन सत्र सुरु केलेले आहे. या मार्गदर्शन सत्रा चे पाचवे पुष्प गुम्फन्यासाठी नाईट हायस्कुल चे सहा. शिक्षक श्री.उत्तम चौगुले सर उपस्थित होते. बोर्ड परीक्षे चे मॉडरेटर म्हणून काम करणारे चौगुले सर 1995 पासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या प्रगल्भ अनुभवाचा फायदा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना लाभला. आपल्या अमोघ वाणीने विद्यार्थी मंत्र मुग्ध झाले. 

दहावीची मराठी विषयाची आदर्श उत्तर पत्रिका कशी असते त्याचा नमुना सादर केला. पेपर लिहिताना कोणती काळजी घ्यावी. याची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना मिळाली ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना परीक्षे मध्ये होणार आहे. या मार्गदर्शनासाठी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी आचार्य फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री.खोंद्रे सर व संस्थापिका संचालिका सौ.सीमा खोंद्रे मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक केले.सौ.क्रांती आलासे मॅडम यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post