कोळिंद्रे येथील विनया देसाईचा संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय प्रवास - जिल्हास्तरीय गायन स्पर्धेत चमकदार कामगिरी
विनया ही कोळिंद्रे येथील ग्रामीण भागात शिक्षण घेत असतानाही संगीताची आवड जोपासत आहे. स्वर साधना शास्त्रीय संगीत विद्यालय, गडहिंग्लज येथे संगीताचे शिक्षण घेत असलेल्या विनयाने जिल्हास्तरीय गायन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. गंगामाई वाचन मंदिर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय गायन स्पर्धेत विनयाने भाग घेतला. तिच्या या यशस्वी वाटचालीबद्दल जिल्हा तृतीय क्रमांक पटकावला असून जनसेवा समाजसेवा नरसू शिंदे सामाजिक संस्था यांच्यावतीने तिचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य सुरेश बूगडे, संतराम कुऱ्हाडे, आनंदा सूतार, विनयाचे वडील व माजी सैनिक संतोष देसाई यांनी विनयाच्या आदी मान्यवर उपस्थित होते. विनयाच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.