लाच प्रकरणी ॲड.पाटणकर याला न्यायालयीन कोठडी

 लाच प्रकरणी ॲड.पाटणकर याला न्यायालयीन कोठडी

थकीत कर्जापोटी बँकेकडून घरावर होणारी जप्तीची कारवाई पुढे ढकलण्यासाठी १ लाख ७० हजार रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेला अॅड विजय तुकाराम पाटणकर यास आज गुरूवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठही सुनावली. त्यानंतर पाटणकर यांना जामीन मिळावा यासाठी दाखल केलेल्या जामीन अर्जावर सोमवार, ता. १६ रोजी सुनावणी होणार आहे.कोल्हापूर येथील इंडियन बँक शाखेतील कायदेशीर सल्लागार अॅड विजय पाटणकर यांना सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागितल्याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा अटक केली होती. अॅड पाटणकर यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्याची मुदत संपल्यानंतर आज गुरूवारी पुन्हा हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर अॅड पाटणकर यांना जामीन मिळवा यासाठी अॅड मेहबूब बाणदार यांनी विनंती अर्ज दाखल केला. यावर दोन्ही बाजूने सुनावणी होऊन न्यायालयाने जामीनावर सोमवार ता.१६ रोजी सुनावणी ठेवली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post