मथुरा हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

मथुरा हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

येथील दातार मळा परिसरात असलेल्या मथुरा हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आयर्न मॅन, प्रसिद्ध गिर्यारोहक मा.श्री.नामदेव कळंत्रे हे उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते क्रीडाध्वजाचे ध्वजारोहण संपन्न झाले. तसेच हिंदुराव शेळके चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री.अतुल शेळके यांच्या हस्ते मैदान पूजन करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.एस.जी.चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त करताना श्री.कळंत्रे म्हणाले, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच व्यायाम करावा, खेळात प्राविण्य मिळवावे. जेणेकरून भविष्यात या गोष्टींचा आपल्या करिअरला उपयोग होईल. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या संचालिका सौ.सुनंदा शेळके, मथुरा विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.डी.इक्कळकी, प्रमोद शेळके इंग्लिश अकॅडमीच्या प्राचार्या जे.पी.सर्वा, तिन्ही शाखांचे सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्र संचालन सहाय्यक शिक्षिका कु.ए.बी.जोंग यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक श्री.वाय. एन.कोथळे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post