कुंभोज येथे समस्त बौद्ध समाजाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन संपन्न
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे )
कुंभोज तालुका हातकलंगले येथे समस्त बौद्ध समाजाच्यावतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिन शांतता रॅली कडून संपन्न झाला. तसेच बौद्ध समाज मंदिरात प्रार्थना करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात बौध्द समाजातील सर्व बांधव उपस्थित होते. यावेळी संपूर्ण दसरा चौकातून शांतता रॅली काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कुंभोज आंबेडकर चौक, दीपक चौक आदी विविध ठिकाणी तसेच शासकीय कार्यालय व शाळांच्या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.