मदन कारंडे यांच्या प्रचारार्थ विक्रमनगर, जयभीमनगर व राधाकृष्ण चौक या परिसरात उत्साहपूर्ण पदयात्रा संपन्न
इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार मदन सिताराम कारंडे यांच्या प्रचारार्थ विक्रमनगर, जयभीम नगर, आणि राधाकृष्ण चौक या परिसरात उत्साहपूर्ण पदयात्रा संपन्न झाली. पदयात्रेत स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला, ज्यातून परिवर्तनाची आकांक्षा स्पष्टपणे दिसत होती.मदन कारंडे यांनी या पदयात्रेत इचलकरंजीच्या विकासासाठी ठोस योजना साकारण्याचा संकल्प व्यक्त केला. "परिवर्तनासाठी एकत्र येऊ, इचलकरंजीच्या प्रगतीसाठी नवा अध्याय लिहू," असा आशावादी संदेश देत त्यांनी या परिवर्तनाच्या प्रवासात सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन केले.