राजूबाबा आवळे यांची प्रचारात आघाडी; हिंगणगावातील पदयात्रेला उस्फूर्त प्रतिसाद

राजूबाबा आवळे यांची प्रचारात आघाडी; हिंगणगावातील पदयात्रेला उस्फूर्त प्रतिसाद 


हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार राजूबाबा आवळे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. हिंगणगाव येथे त्यांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तसेच महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. फटाक्यांच्या आतषबाजी करीत राजूबाबा आवळे यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावातून पदयात्रा काढण्यात आली. महिलांनी जागोजागी त्यांचे औक्षण केले. यावेळी बोलताना राजूबाबा आवळे म्हणाले, महाविकास आघाडीची एकसंघ ताकद माझ्या पाठीशी असून गेल्या पाच वर्षात  केलेल्या विकासकामांच्या जोरावर आपला विजय निश्चित आहे.

Post a Comment

Previous Post Next Post