दि इचलकरंजी बार असोसिएशन यांच्यावतीने संविधान दिन साजरा व २६/११ हल्ल्यातील शहीदाना श्रद्धांजली

दि इचलकरंजी बार असोसिएशन यांच्यावतीने संविधान दिन साजरा व २६/११ हल्ल्यातील शहीदाना श्रद्धांजली 




दि इचलकरंजी बार असोसिएशन इचलकरंजी यांच्यावतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रयाच्या अध्यक्षस्थानी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधिशसो माननिय मंदार नेरलेकर हे होते. या कार्यक्रमात 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना ही श्रद्धांजली वाहिन्यात आली त्यानंतर संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननिय नेर्लेकर साहेब यांचे स्वागत अध्यक्ष ॲड.तोष्णीवाल साहेब यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. त्यानंतर संविधानाची व त्यातील नागरिकांच्या बाबत शिक्षणा संबंधी असलेल्या तरतुदी बाबत विश्लेषण केलं. तसेच संविधाना बाबत व त्याच्या निर्मिती व इतर तरतुदी बाबत ॲडव्होकेट संदीप कदम हुपरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांचा सत्कार बारचे सेक्रेटरी ॲड.अभिजित माने यांनी केला. यावेळी दि इचलकरंजी बार असोसिएशन तर्फे वकिलांच्यासाठी तज्ञ व अभ्यासू वक्त्यांचे मार्गदर्शन व्याख्यान सीरीजची सुरवात करणेत ही करण्यात आली. यावेळी त्याची सुरवात ॲड.आय.एम.जमादार व ॲड.डी.एम.लटके यांच्या अथक परिश्रमातुन झाली. यासाठी त्यांचा विशेष सत्कार बार असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष ॲड. राजेंद्र सुतार यांनी केला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला प्रतिनिधी ॲड.हणबर मॅडम यानी केले. यावेळी या कार्यक्रमासाठी दि इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, कार्यकारीणी सदस्य व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post