महासिद्ध मंदिर चंदुर येथून महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांचा प्रचार शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

महासिद्ध मंदिर चंदुर येथून महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांचा प्रचार शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न 


नगरसेवक असताना राज्यातील घनिष्ठ संबंध निर्माण करत अनेक पक्षातील विविध राजकीय प्रमुखांची संपर्क ठेवल्याने शहरासह ग्रामीण भागातील विकास केला. तारदाळ-खोतवाडी या ठिकाणी साडेबारा कोटी रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करत ग्रामीण भागाला एक दिवस आड पाणी देण्याचे काम केले आहे. त्यामुळे एकदा संधी द्या आमदार काय असतोय ते दाखवून देतो असे आवाहन मदन कारंडे यांनी केले. महासिद्ध मंदिर चंदुर येथून महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांचा प्रचार शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी अनेकांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. 


यावेळी शिवगोंडा पाटील व श्रीनिवास कुंभार यांनी मनोगत व्यक्त केली. कारंडे पुढे म्हणाले, पक्षातील तत्त्व व निष्ठा सोडली नसल्यानेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सहा महिन्यापूर्वीच आपली उमेदवार निश्चित केली होती असे सांगत आमदार म्हणून एकदा संधी द्या आमदार कसा असतो हे कामाच्या स्वरूपात दाखवून देतो असे त्यांनी शेवटी नमूद केले. यावेळी कल्लेश्वर वाघमोडे, मधुकर खटावकर, दादासो शिंदे, सचिन शिंदे, प्रकाश कांबळे, किरण पाटील, अण्णासो वाघमोडे, आण्णासो पाटील, दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, जयान्ना पाटील, रमेश मगदूम, सुरज लाड, राजू स्वामी, लक्ष्मण सूर्यवंशी, आप्पासो परिट, बाबासो सूर्यवंशी, गुंडा कांबळे, बबन शिंदे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post