संभाजी ब्रिगेडचा डॉ.मिणचेकरांना जाहीर पाठिंबा : जिल्हाध्यक्ष मिलिंद चौगुले

संभाजी ब्रिगेडचा डॉ.मिणचेकरांना जाहीर पाठिंबा : जिल्हाध्यक्ष मिलिंद चौगुले 


मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे. तसतसे परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार डॉ.सुजित मिणचेकर यांना हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे मिणचेकर यांचे पारडे जड होवु लागले आहे. डॉ.सुजित मिणचेकर यांना संभाजी ब्रिगेड संघटनेचा बिनशर्थ जाहीर पाठिंबा केल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष मिलिंद चौगुले यांनी जाहीर केली. यावेळी बोलताना मिणचेकर म्हणाले, विविध संघटना तसेच अनेक समाजाकडून मिळणारा पाठिंबा हा माझ्या विजयाचे संकेत आहे. पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे त्यांनी मनापासून आभार मानले आहेत. यावेळी तालुका अध्यक्ष दिपक कुन्नुरे, स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे प्रमुख सौरभ शेट्टी, शिवसेना शहर प्रमुख धोंडीराम कोरवी, माजी पंचायत समिती सदस्य पिंटू मुरूमकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त केले. पाठींबा देताना तालुका उपाध्यक्ष अरुण परिट, शहर उपाध्यक्ष प्रवीण मोरे, अनिकेत सरनाईक, मधुकर चौगुले, वैभव माने, प्रतीक शिंदे नवनाथ मोरे, राजू गुरव, शशिकांत वाळके यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post