बोरगाव येथील स्पूर्ती युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी साकारली शिवकालीन जंजिरा किल्याची हुबेहूब कलाकृती
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य स्थापन करण्यासाठी बारा बलुतेदार व अठरा पगड जातींच्या सैनिकांना आपलेसे करून स्वराज स्थापन केले आहे,यामध्ये राजांनी निर्माण केलेल्या किल्ला, मंदिरे यांचा वाटा महत्त्वाचा आहे. त्यामुळे आजच्या आधुनिक काळात युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती मिळावी यासाठी युवकांनी किल्ला कलाकृती उभारणी ही आज काळाची गरज आहे असे मत निपाणी हाल सिद्ध नाथ साखर कारखान्याचे संचालक व नगर सेवक शरद जंगठे यांनी व्यक्त केले. ते बोरगांव येथील स्पूर्थी युवक मंडळ,डकरे गल्ली यांनी उभारलेल्या शिवकालीन जंजिरा किल्ल्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. गेली पंधरा दिवस मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समुद्र किनारी असणारा शिवकालीन जंजीरा किल्याची कलाकृती निर्माण करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. सर्वांनी या किल्ल्याचे पाहणी करून त्यांना प्रोत्साहन द्यावे अशी आवाहन श्री शरद जंगठे यांनी केले. यावेळी शरद जंगठे यांच्या हस्ते किल्ला लोकार्पण चे फीत कापून उद्घाटन करण्यात आले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला शरद जंगठे,जितू पाटील यांनी पुष्प अर्पण करून श्रीपळ वाढवले, मंडळाचे अध्यक्ष बबन रेंदाळे,इलई कापसे यांनी सत्कार केला, शिव कालीन जंजीरा किल्ला ची हुबेहूब प्रतिकृती तयार केल्या प्रसंगी जंगठे यांनी मंडळास पांच हजार रुपये चे बहुमान दिले, पुढच्या वर्षीच्या दिवाळी सणासाठी बोरगांव येथील युवकांच्या साठी किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना एक ते पाच क्रमांकाचे बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी श्री शरद जंगठे यांनी केले. किल्ला स्पर्धा चे नियोजन स्पुर्थी युवक मंडळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. यावेळी नगरसेवक शरद जंगठे,जितू पाटील,बिपिन देसाई,पत्रकार अजित कांबळे,बबन रेंदाले, ईलाई कापसे,राजू नदाफ,सुरेश कदम,शुभम रेंदाले,राहुल रेदाळे, गोटू कापसे, सुजित खरात रोहित डकरे,केदार सुतार,विलास सुतार,विनायक नारशिंगे,समर्थ जोंधळे यांच्यासह स्पूर्थि युवक मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.
वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगांवहुन अजित कांबळे