घोसरवाड येथे राजेंद्र पाटील यड्रावकर यांची पदयात्रा उत्साहात संपन्न हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग
राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ घोसरवाड येथे प्रचार रॅली करण्यात आली,उपचार रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.येथील सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष व माजी उपसरपंच सोनल मगदूम यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीत जाहीर प्रवेश केला. स्वागत खंडू भोरे यांनी स्वागत केले.यावेळी जयसिंग वडर,नंदकुमार नाईक, राजेंद्र जुगळे,मयुर खोत,सोनल मगदूम, अमर माळी,विजितसिंह शिंदे सरकार यांनी आपल्या मनोगतातून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विकास कामाचा आढावा घेतला व घोसरवाड गावातून आमदार यड्रावकर यांना मोठे मताधिक्य देऊन निवडून आणण्याचा निर्धारही केला.यावेळी आमदार यड्रावकर यांनी आज अखेर घोसरवाड गावासाठी सुमारे ६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यापुढेही घोसरवाड गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहीन,अशी ग्वाही दिली व शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करावे, असे आवाहन केले.
यावेळी पंचगंगेचे संचालक जयपाल मिसाळ, बाबासाहेब मिसाळ, सुनील लगड, विलास खोत, राजेंद्र जुगळे, सुनील अकिवाटे,माजी सरपंच बाबासो पुजारी, नंदकुमार नाईक नंदीकुरळे, आकाश गुरव, अल्ला बागवान, लक्ष्मण नाईकवाडे, कल्लाप्पा पुजारी, रणजीत मिसाळ, मारुती मिसाळ, रोहित बावचे, विनोद भिरडे,सत्यजित खोत, धिरज पवार, नुकतर चाऊस, प्रल्हाद खोत यांच्यासह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार सतीश नाईक यांनी मानले.
विनोद शिंगे कुंभोज