सुज्ञ जनता ही महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या पाठीशी राहिल ; भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर

सुज्ञ जनता ही महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या पाठीशी राहिल ; भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर 


मतदासंघात उभारलेला विकासकामांचा डोंगर पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणूनच ज्याला पराभूत करता येत नाही त्याला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. जनतेत गैरसमज निर्माण केले जात आहेत. पण सुज्ञ जनता ही महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या पाठीशी राहिल, असा ठाम विश्‍वास भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केला. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ जिव्हाजी सांस्कृतिक भवन येथे कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला. त्यामध्ये मार्गदर्शन करताना माजी आमदार हाळवणकर बोलत होते.भाजपा विधानसभेच्या निरीक्षक आमदार सौ. शशिकला जोल्ले आणि आमदार प्रकाश आवाडे यांनी आपल्या मनोगतात, राज्यातील महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य लोकांची कामे करणारे आपले सरकार आहे. लोकांची आवश्यकता समजून काम करणारे आहे. लाडकी बहिण योजनेचा लाभ सर्व जातीधर्माच्या महिलांना दिला. त्यामध्ये कोणताही भेदभाव केला नाही. राहुल आवाडे यांनीही आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहचविल्या आहेत. त्यामुळे राहुल आवाडे यांच्यासारख्य नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले. यावेळी विलास गाताडे, धोंडीराम जावळे, भाजप शहराध्यक्ष पै.अमृत भोसले, महादेव हाळवणकर, शशिकांत मोहिते, प्रदीप धुत्रे, सुकुमार पाटील, सारीका पाटील, इम्रान बागवान, मनोज साळुंखे, नरसिंह पारीक, संतोष कांदेकर, वृषभ जैन, कोंडीबा दवडते, सौ. विद्या सुतार, सौ.नागुबाई लोंढे यांच्यासह भाजप महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post