आमदार प्रकाश आवाडे यांना 'आण्णासाहेब गोडबोले' पुरस्कार

आमदार प्रकाश आवाडे यांना 'आण्णासाहेब गोडबोले' पुरस्कार 


सहकार चळवळीतील विशेष योगदानाबद्दल सहकार भारतीच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांना 'कै. अण्णासाहेब गोडबोले पुरस्कार' हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे. सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे १४ वे त्रैवार्षिक अधिवेशन २१ व २२ सप्टेंबर रोजी शिर्डी येथे होणार आहे. या अधिवेशनामध्ये राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.सहकार भारतीचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब गोडबोले यांच्या नावाने सहकार क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तीला त्रैवार्षिक अधिवेशनामध्ये पुरस्कार दिला जातो. यंदाच्या पुरस्कारासाठी आमदार आवाडे यांची निवड करण्यात आली. याबाबचे पत्र भालचंद्र कुलकर्णी, सहकार भारती कार्यालय प्रमुख श्रीकांत पटवर्धन, जिल्हाध्यक्ष जवाहर छाबडा, जिल्हा महामंत्री धोंडीराम पागडे व महाराष्ट्र प्रदेश महिला संस्था प्रकोष्ट प्रमुख सौ.वैशाली आवाडे यांनी दिले.

Post a Comment

Previous Post Next Post