गोकाक तालुक्यातील ममदापूर येथे जमिनीच्या वादातून एकाची हत्या ; गोकाक पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद
श्रावणमास असल्याने गोकाक तालुक्यातील ममदापूर येथील श्री बीर सिद्धेश्वर मंदिरमध्ये रात्री भजनाचा कार्यक्रम आटोपून मंदिराच्या कट्ट्यावर झोपलेल्या एका व्यक्तीचा ऊस तोडण्याच्या कोयत्यांनी मानेवर प्राण घातक हल्ला करून त्याच्या खून करण्यात आल्याची खळबळ जनक घटना गोकाक तालुक्यातील ममदापूर या गावात घडली आहे. यात मद्देप्पा यल्लाप्पा बनाशी वय वर्षे 47 असे हल्ल्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटना स्थलावरून मिळालेली अधिक माहिती अशी की मद्यपा यांनी गावातील श्री बीर सिद्धेश्वर मंदिर येथे रात्री भजनाचा कार्यक्रम आटपून मंदिराच्या कट्ट्यावर झोपलेला असताना त्याच गावातील बिराप्पा सिद्धप्पा सिंदोली यांनी आपल्याकडील ऊस तोडणीच्या कोयत्याने मद्देप्पाच्या मानेवर प्राणघातक हल्ला.केला, या हल्ल्यामध्ये मध्येप्पा गंभीर जखमी झालेने गोकाक चां सिविल दवाखान्यात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गोकाक तालुक्यातील ममदापूर येथे राहणाऱ्या बिराप्प व मद्यपा यांच्यात अनेक दिवसापासून शेतकरी जमिनीच्या वादातून वारंवार भांडणे होत होती, याच भांडणाचा विषय टोकाचा वादात निर्माण झाले, या वादाचे पर्यवसान बिरप्पणे मंदिरात कट्ट्यावर झोपलेल्या मद्देप्प वर वार करून त्यांची हत्या केली. सदर घटनेची नोंद गोकाक ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये झाली असून अधिक तपास गोकाक पोलिस अधिकारी करत आहे.
वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगांवहुन अजित कांबळे