वाहतूक नियमांचे उल्लंघन सातजणांना प्रत्येकी १० हजाराचा दंड

 वाहतूक नियमांचे उल्लंघन सातजणांना प्रत्येकी १० हजाराचा दंड

वाहतूक नियमांचे उल्लंघन सातजणांना प्रत्येकी १० हजाराचा दंड 

मद्यप्राशन करुन वाहन चालविणे, कागदपत्रे न बाळगणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन आदी विविध कलमांखाली शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात ७ जणांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावला. इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने वाहतूकीला शिस्त लागावी, वाहतूक नियमांचे उल्लंघन होऊ नये त्याचबरोबर वाहन चोरी आदींच्या अनुषंगाने कारवाई केली जात आहे. त्याच अनुषंगाने शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून मद्यप्राशन करुन वाहन चालविणे, वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे, नियमांचे उल्लंघन करणे आदी गुन्ह्याखाली केसीस दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्वांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी प्रत्येकी १० हजार रुपयांची शिक्षा ठोठावली.

Post a Comment

Previous Post Next Post