इचलकरंजी येथे जैन फ्रेंड्स सर्कलतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

 इचलकरंजी येथे जैन फ्रेंड्स सर्कलतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर 


इचलकरंजी येथील जैन फ्रेंड्स सर्कल व आथायु हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्यावतीने रविवार ९ जून रोजी सकाळी ९.३० ते ५.३० या वेळेत मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे.


 हे शिबिर येथील अग्रसेन भवन, दाते मळा येथे होणार असून शिबिराचे शुभारंभ आयुष्मान भारत योजनेचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष दिनेश छाजेड, प्रोजेक्ट चेअरमन प्रदीप बोहरा, सचिव नितेश छाजेड यांनी दिली. शिबिरामध्ये हृदयविकार, मूत्रविकार, हाडांचे विकार, कॅन्सर पूर्व लक्षणे, त्वचा विकार या आजारांविषयी तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबीरामध्ये डॉ. रुपाली कपाले, डॉ. अमृता शिनगारे, डॉ. राहुल पाटील, डॉ. बसवराज कडलगे, डॉ. जिनेश्वर कपाले, डॉ. सर्वेश तायशेटे, डॉ. आशिष दनाने, डॉ. श्रीकृष्ण काळे, डॉ. संध्या ढवळे, डॉ. कार्तिक स्वामी, डॉ. जुनैद मुजावर यांच्याकडून तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पिवळे व केशरी रेशन कार्ड व आधार कार्डधारकांना हृदयाची अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, पेसमेकर, किडनीमधील मुतखडा, किडनी व लघवीच्या मार्गातील खडे, लघवीच्या पिशवीमधील खडे, प्रोस्टेट शस्त्रक्रिया, लघवीच्या पिशवीचा कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, मूत्रमार्गातील अडथळा काढणे, किडनी निकामी झाल्यास लागणारे उपचार व शस्त्रक्रिया, मूत्रनलिका इंज्युरी, हाडाचे फॅक्चर, दुर्बिणीद्वारे गुडघ्याचे लिगामेंट शस्त्रक्रिया, सर्व कॅन्सर शस्त्रक्रिया ऑपरेशन केले जाणार आहेत. तसेच मोफत ई.सी.जी., रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब, वजन, लघवीची धार तपासणी, प्रोस्टेट विशिष्ट अँटीजन तपासणी, हाडाची ठीसुळता तपासणी करण्यात येणार आहे. तसेच सवलतची दरात अँजिओग्राफी, किडनी सोनोग्राफी, हाडाचे एक्स-रे, रक्त व लघवी तपासणी, एमआरआय करण्यात येणार आहे. या शिबीरासाठी गौतमचंद, जवेरीलाल, महेंद्रकुमार छाजेड़, महेंद्र सेल्स कॉर्पोरशन यांनी प्रायोजक केले आहे. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी शिबिराचा लाभ यावा, असे आवाहन जैन फ्रेंड्स सर्कल यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post