आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्याहस्ते निपाणी येथे " गाभ " या नवीन चित्रपटाच्या पहिल्या शोचे उद्घाटन
ग्रामीण भागातील जीवन जगण्यासाठी करावी लागणारी धडपड याचे तंतोतंत दर्शन श्री.अनुप जत्रातकर लिखित व दिग्दर्शित "गाभ" या नवीन चित्रपटात दाखवण्यात आले आहे. निपाणीतील चित्रपट गृहात गाभ या शोचा नुकताच उद्घाटन सोहळा पार पडला.कर्नाटकच्या माजी मंत्री व आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते या नूतन शो चे उद्घाटन करण्यात आले. शेतकरी हा भारतीय अर्थकरणाचा कणा आहे .खेड्यातील जीवनाचे साधन असलेल्या दुग्ध व्यवसायाच्या वास्तवावर भाष्य करणारा हा गाभ चित्रपट आहे. रेडांची कमी होणारी संख्या यामुळे म्हैस गाभण राहण्यासाठी करावी लागणारी वणवण, निपाणीतील जत्राट या गावचे सुपुत्र, कथा, लेखक, दिग्दर्शक श्री अनुप जत्राटकर यानी आपल्या " गाभ " या चित्रपटात दाखवण्याचां प्रयत्न केला आहे.माजी मंत्री आणि निपाणी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सौ. शशिकला जोल्ले यांनी प्रदर्शित झालेल्या गाभ या चित्रपटाचे गोड कौतुक केले. निर्माते आणि त्यांच्या टीम सदस्यांना चित्रपटाच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी गाभ या चित्रपटाचे दग्दर्शक श्री अनुप जत्राटकर, हालसिदनाथ सहकारी साखर कारखानाचे अध्यक्ष एम.पी.पाटील, रमेश कांबळे आदिसह परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगांवहून अजित कांबळे.