राजकारणातील भिष्माचार्य वसंतराव झेले यांचे निधन
तब्बल ५० वर्ष तारदाळमध्ये अधिराज्य गाजविलेले राजकारणातील भिष्माचार्य म्हणून ओळख असणारे तसेच सरपंच पद ते हातकणंगले तालुक्याचे सभापती पद भूषविलले एक हर हुन्नरी नेता वसंतराव नाभीराज झेले यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. त्यामुळे एका कणखर प्रामाणिक राजकीय व्यक्तीमत्वाला तारदाळकर मुकले असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. झेले आण्णांच्या निधनाने राजकारणात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. अशा प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त होत आहेत. गेली ५० वर्ष तारदाळसह परीसरात आपली कारकीर्द गाजविणारे अभ्यासू नेते राजकारणातील अजातशत्रू अंत्यत साध व्यक्तीमत्व म्हणून झेले आण्णा परिचीत होते. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व स्व कर्तृत्वातून राजकीय उंची गाठणारे व नेता कसा असावा याचे अत्यंत चांगले उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सरपंच पद ते सभापती पद असा त्यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी होता. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचा सच्चा कार्यकर्ता, सहकार महर्षी कल्लाप्पाणा आवाडे दादा, आमदार प्रकाश आवाडे, माजी.खा.राजु शेट्टी यांच्यासोबत सहकार व राजकारणात गावासाठी सातत्याने काम करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले एक मुलगी असा परिवार आहे.