मांगूर ग्रामपंचायत अध्यक्षपदी समविचारी आघाडीचे राहुल प्रताप बिनविरोध
निपाणी तालुक्यातील मांगुर येथील ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष स्वप्निल माने सरकार यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या ग्रामपंचायत अध्यक्ष पदासाठी गुरुवार दि.२७ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पाडली. यामध्ये अध्यक्षपदासाठी राहुल प्रताप यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी आप्पासो पुजारी यांनी राहुल प्रताप यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. सदर निवडीनंतर माजी ग्रामपंचायत अध्यक्ष, विद्यमान ग्रामपंचायत अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना नूतन अध्यक्ष प्रताप म्हणाले आपल्या सर्वांच्या सहकार्याने माझी मांगूर ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी निवड झाली असून येणाऱ्या काळात सर्वांना विश्वासात घेऊन गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. या निवडीनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिश बाजी गुलालाची उधळन केली. यानंतर श्री कल्लेश्वर मंदिर, मांगुर ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ, महर्षी वाल्मिकीचे दर्शन घेण्यात आले. यावेळी मल्लाप्पा चौगुले, पिंटू पाटील, वीरेंद्र माने सरकार, विनय बोधले, रमेश जाधव, शिवाजी प्रताप, सचिन बोधले, यांच्यासह समविचारी आघाडीचे ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगांवहुन अजित कांबळे