पतित पावन विद्यामंदिरात नवागतांचे स्वागत

 पतित पावन विद्यामंदिरात नवागतांचे स्वागत

ओझर्डे दि.15 येथील पतित पावन विद्यामंदिर ओझर्डे .ता.वाई जि.सातारा या विद्यामंदिरात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत व दहावी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच आकाशवाणी केंद्रावर कार्यक्रम सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 


नवागत विद्यार्थ्यांची शाळेच्या प्रवेशद्वारापासून सवाद्य मिरवणूक काढून त्यांचे स्वागत करण्यात आले .त्यांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री महेश पिसाळ, श्री मनोज भोईटे व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रा. सौ. वंदना यादव यांनी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करून दहावीतील गुणवंत विद्यार्थी व आकाशवाणीवर कार्यक्रम सादर करणारे विद्यार्थी यांना शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले. सीना स्टार या चॅनेलच्या माध्यमातून  डान्स स्पर्धा घेण्यात आली होती यामध्ये विद्यालयाच्या विद्यार्थिनी कुमारी सानिका जाधव हिची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवडी बद्दल मुख्याध्यापिका यादव मॅडम यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. याचबरोबर विद्यालयाकडून नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना  गिफ्ट म्हणून वही व पेन देण्यात आले. त्याचबरोबर इयत्ता दहावी परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांना विद्यालयामार्फत गौरव पत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ प्रतिभा बेलोशे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सचिन माने यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी विद्यालयाची प्रगतीचा आढावा दिला व संस्थेची संपूर्ण माहिती नवीन विद्यार्थ्यांना दिली. आभार ज्येष्ठ शिक्षक श्री दीपक महापुरे यांनी मानले. यावेळी श्री एम.ए.मुकादम, डॉ.सुनील फरांदे, श्री समीर आतार, नेत्रा सोनावणे श्री सागर पुजारी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post