मंत्री सतिश जारकिहोळी यांच्याकडून बोरगांव येथील रावसाहेब पाटील कुटुंबीयांचे सांत्वन ; आम.लक्ष्मण सवधी, आम.गणेश हुक्केरी यांची उपस्थिती

मंत्री सतिश जारकिहोळी यांच्याकडून बोरगांव येथील रावसाहेब पाटील कुटुंबीयांचे सांत्वन ; आम.लक्ष्मण सवधी, आम.गणेश हुक्केरी यांची उपस्थिती 


बोरगांव येथील श्री अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष, सहकार रत्न, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष, श्रवाक रत्न, स्वर्गीय रावसाहेब पाटील यांचे गेल्या 25 जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. कर्नाटक राज्याचे लोकोपयोगी व बेळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री ना सतीश जारकीहोळी यांनी काल सकाळी बोरगांव येथील स्वर्गीय रावसाहेब पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना पालक मंत्री म्हणाले की स्वर्गीय रावसाहेब पाटील दादा यांनी बोरगांव च्या विकासा साठी आयुष्य भर प्रयत्न केले,   रावसाहेब पाटील यांनी त्यांच्या आई-वडिलांकडून संस्कार घेऊन कुशल सामाजिक कार्य केले आहे. परिसराच्या विकास करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केलेत.  प्रतिकुल परिस्थितीत देखील अनेक आव्हानांना तोंड देत धार्मिक कार्याला सहकार्य आणि सामाजिक कार्याची जोड दिली. आयुष्यात अनेक संघर्ष करून यश मिळविले आहे, अरिहंत चां माध्यमातून बोरगांव सह परिसरातील जनतेला रोजगार देण्याचे महत्वाचे काम दादांनी केले आहेत. असेही पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. जारकीहोळी यांनी शनिवारी (ता. २९) बोरगाव येथील सहकाररत्न रावसाहेब पाटील यांच्या घरी जाऊन पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले. शिवाय पाटील कुटुंबाला धीर दिला. त्यावेळी ते बोलत होते. रावसाहेब पाटील यांनी केवळ बोरगाव नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली आहे. दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी आम लक्ष्मण सवदी, आम गणेश हुक्केरी यांनी देखील युवा नेते उत्तम पाटील,अभिनंदन पाटील यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी केपीसीसी सचिव सुनिला हणमन्नवर, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, बुडा अध्यक्ष लक्षण चिंगळे, किरण राजपूत, पंकज पाटील यांच्यासह काँग्रेस नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

वसुंधरा शक्ती न्यूज बोरगावहुन - अजित कांबळे

Post a Comment

Previous Post Next Post