मंत्री हसन मुश्रीफ यांनी जनतेकडून करून घेतली सहलीची रजा मंजूर

मंत्री हसन मुश्रीफ यांनी जनतेकडून करून घेतली सहलीची रजा मंजूर







वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ पंधरवड्याच्या परदेश सहलीवर जातानासुद्धा जनतेकडून रजा मंजूर करून घेणारे ते आगळेवेगळे लोकप्रतिनिधी ठरले आहेत. परदेश दौऱ्यासाठीच्या या पंधरवड्याच्या रजा मंजुरीबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. दरम्यान, मुश्रीफ यांच्यासह जिल्हा बँकेचे सर्व संचालक पंधरा दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. इटली व स्पेनच्या सहलीवर पंधरवड्यासाठी ते जात असून, पंधरवड्यापासून प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेकडून त्यांनी रजा मंजूर करून घेतली आहे. शुक्रवार दि.१० ते २४ मे या दरम्यान ते परदेश दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या कागलमधील घराबाहेरच्या फलकावर याबाबतचे जाहीर निवेदन केले आहे. या फलकावर लिहिलेले आहे, ४ जून रोजीच्या मतमोजणीसाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा ! पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यावेळी पंतप्रधान निश्चित होतील, याची खात्री आहे. दरम्यान, येणारा महिनाभर संपूर्ण देशभरात आचारसंहिता सुरू असल्यामुळे या कालावधीमध्ये मतदारसंघ, जिल्हा, राज्य व मंत्रालयामध्ये व्यक्तिगत व विकासाची कामे होत नाहीत म्हणून केडीसीसी बँकेच्या सर्व संचालकांनी स्वखर्चाने इटली व स्पेनचा प्रदेश दौरा आयोजित केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post