कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह, बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे यांना Best chairman of the year पुरस्कार प्रदान
पुणे येथे आयोजित केलेल्या ऑल इंडिया अर्बन को ऑप बँकिंग अवॉर्ड्स २००२४ या सत्कार समारंभामध्ये क्रेस्ट इन्फो मीडिया प्रा.लि.नोएडा, उत्तर प्रदेश या प्रतिथयश संस्थेकडून कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह, बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे यांना Best chairman of the year तसेच बँकेमध्ये अत्याधुनिक डिजिटल सुविधेचा वापर करून ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी नेहमी अग्रभागी राहिल्याबद्दल बँकेस Best Digital Bank of the year हे पुरस्कार देवून सन्मानित करणेत आले. यावेळी बँकेचे व्हा. चेअरमन संजयकुमार आनिगोळ, व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत चौगुले संचालक बाबुराव पाटील, बाळकृष्ण पोवळे, बंडोपंत लाड, तात्यासो अथने, महेश सातपुते, श्रीशैल कीत्तुरे, शैलेश गोरे, अविनाश कांबळे, राजू चव्हाण, सचिन देवरुखकर, योगेश पाटील, रमेश पाटील बँकेचे सी ई ओ संजय शिरगावे, असि. जनरल मॅनेजर संतोष तेरदाळे, फिरोज मेंदर्गी, विश्वास घोटने, अभय पुजारी, नितीन पाटील यांचेसह देशातील नागरी सहकारी बँकांचे पदाधिकारी, अधिकारी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.