मुलांच्या शाळा प्रवेशासाठी डोनेशन घेतल्यास संबंधित शाळांची नोंदणी रद्द होणार ; बेळगांव जिल्हाधिकारी नितेश पाटील
कर्नाटक राज्यात 31 मे पासून सन 2024 - 2025 या शैक्षणिक पर्वाला सुरुवात होणार आहे, त्यासाठी बेळगांव जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित मुलांच्या व शाळांमध्ये प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारचे डोनेशन घेता येणार नाही. मात्र, शाळांनी नियमबाह्यपणे देणग्या घेतल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा बेळगांव जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे. या संबंधित जे.आर. ह्युमन राईटस के आर ऑर्गनायझेशन यांच्यावतीने याबाबत कर्नाटकचे शिक्षणंमंत्री व गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. जून 1 पासून शाळा प्रवेश प्रक्रिया सुरु झाली होणार आहे, काही शाळांमध्ये डोनेशन घेतले जात आहे. त्याच्या तक्रारी पालकांकडून आल्या आहेत. नियमानुसार शासनाने निश्चित केलेले शुल्क घेऊनच प्रवेश द्यावा. देणगी बेकायदेशीररित्या मिळाल्यास कायद्यानुसार आरटीई अशा शाळांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. शिक्षण हक्क कायदा २००९ च्या कलम २ (बी) नुसार सर्व खासगी शाळांनी अधिसूचित शुल्क त्यांच्या शाळेच्या संकेतस्थळावर शाळेच्या सूचना फलकावर आणि इंटरनेटवर उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही शाळेने देणगी मागितल्यास किंवा देणगी मिळाल्यास पालक तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालय किंवा उपसंचालक कार्यालयाकडे तक्रार करू शकतात. शासकीय, निमशासकीय शाळांनी नियमबाह्य प्रवेश प्रक्रिया राबविली तर त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त पालकांनी केली आहे, तर बेळगांव चे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या या निर्णयाचे पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
बोरगांव - अजित कांबळे .