भाजपा उपाध्यक्ष पदी सुधाकर हेब्बाळे यांची तर वाहतूक आघाडी उपाध्यक्ष पदी मांतेश हौसमन्नी यांची निवड

भाजपा उपाध्यक्ष पदी सुधाकर हेब्बाळे यांची तर वाहतूक आघाडी उपाध्यक्ष पदी मांतेश हौसमन्नी यांची निवड



इचलकरंजी गुरूकन्ननगर येथील सुधाकर हेब्बाळे यांची भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर उपाध्यक्ष पदी तर मांतेश हौसमन्नी यांची वाहतूक आघाडी इचलकरंजी शहर उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र शनिवारी सायंकाळी लिंबू चौक येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपा कोल्हापूर जिल्हा माजी उपाध्यक्ष तथा यंत्रमाग महामंडळ माजी अध्यक्ष हिंदूरावजी शेळके, भाजपा शहर अध्यक्ष पै.अमृतमामा भोसले, संजय गांधी निराधार योजनेचे माजी सदस्य तम्मान्ना कोटगी, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, माजी नगरसेवक रवी लोहार, माजी नगरसेवक संतोष शेळके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सुधाकर हेब्बाळे व मांतेश हौसमन्नी यांनी आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशात सर्व क्षेत्रात केलेल्या विकासामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उचविले आहे. त्यांच्या या देश हिताच्या कार्यार्थ तसेच भविष्यातील उज्वल भारत घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी आम्ही कार्यरत राहणार असल्याचे हेब्बाळे व हौसमन्नी यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेविका अक्काताई कोटगी, भाजपा युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष चिदानंद कोटगी, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, माजी नगरसेवक नागेश पाटील, माजी नगरसेवक मोहन कुंभार, भाजपा महिला अध्यक्षा अश्विनी कुबडगे, मदन जाधव, उद्योगपती बंडोपंत लाड, मल्लू पालापुर, राहुल नरेवाडी, नितीन वाडेकर, रामदास चौगुले, महेश शेवाळे, चेतन वाडेकर, नंदकुमार बंडगर आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post