पद्मश्री डॉ.जी.डी.यादव (जेष्ठ शास्त्रज्ञ) यांची रत्नप्रकाश आयुर्वेदला भेट

पद्मश्री डॉ.जी.डी.यादव (जेष्ठ शास्त्रज्ञ) यांची रत्नप्रकाश आयुर्वेदला भेट


राधानगरी तालुक्यातील, चांदेकरवाडी येथील तरुण शेतकरी श्री.कुलदीप खोत यांनी स्थापन केलेल्या रत्नप्रकाश वनौषधी लागवड व प्रक्रिया उद्योगास, पद्मश्री डॉ.जी.डी.यादव यांनी सदिच्छा भेट दिली. डॉक्टर जी.डी.यादव यांनी आजपर्यंत घडवलेल्या 111 पीएचडी, 147 मास्टर्स, आणि 48 पोस्ट डॉक्टरेट संशोधकांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचे प्रतिबिंब म्हणून, त्यांना एशियन सायंटिस्ट मॅक्झिन ने आशियातील सर्वोच्च १०० शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये जेष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर जी. डी. यादव यांचा नुकताच समावेश झाला आहे. देश-विदेशातील 151 पुरस्काराने ते सन्मानित आहेत, याचबरोबर त्यांच्या नावे 123 पेटंट आहेत. तसेच उद्योगपती मुकेश अंबानी हे त्यांचे विद्यार्थी होत.प्रकल्पावरील स्पिरुलिना शेवाळ शेती, मधमाशी पालन, औषधी वनस्पतींची प्रक्रिया, यांची पाहणी करून,  "रत्नप्रकाश आयुर्वेद" या आउटलेटला भेट देऊन, पक्क्या उत्पादनांची माहिती घेऊन, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी, शास्त्रज्ञ डॉक्टर हेमराज यादव, आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर अश्विनी यादव, त्यांचे भाचे कृष्णात खोत (मा.सरपंच), साताप्पा खोत, सौ.दिपाली खोत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post