हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल त्या शिक्षिकेला निलंबीत करा ; विश्व हिंदुपरिषद बजरंग दलची मागणी


प्रभू श्री राम यांच्याबद्दल अपशब्द बोलून हिंदूच्या भावना दुखावल्याबद्दल त्या शिक्षिकेला कायमस्वरुपी निलंबीत करावे अशी मागणी हुपरी शहर विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्यावतीने हुपरी पोलीस ठाणे व जनता शिक्षण प्रसारक मंडळ यांच्याकडे करण्यात आली. जनता शिक्षण प्रसारक मंडळ हुपरी इथे कार्यरत असणाऱ्या एका शिक्षिकेने प्रभू श्रीरामचंद्र म्हणजे श्री रामलला यांची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर कॉलेजमध्ये लेक्चर देत असताना सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रभू श्री रामचंद्र यांच्या बद्दल त्यांनी अपशब्द वापरत आहेत. प्रभू रामचंद्र मुळात अस्तित्वात नाहीत, बाबरी मज्जिद विनाकारण पाडली, रामाचा जन्मच झालेला नाही, कशाला त्यांचे मंदिर बांधून सरकार पैसे वाया घालवत आहे, राममंदीर बांधून तुमच्यावर सरकारने हिप्नोटीझम केलेले आहे, राम वगैरे असं कोणीही नाही. अशा पद्धतीने वक्तव्य करून हिंदू धर्माच्या भावना दुखावण्याचे काम व हिंदूच्या मनामध्ये हिंदूधर्माबद्दल द्वेष पसरविल्या बद्दल विश्वहिंदू  परिषद बजरंग दलच्या सर्व कार्यकर्त्यांनी जनता कॉलेजमध्ये जाऊन प्राचार्यांना जाब विचारला यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करत दोषी शिक्षिकेवर लवकरच कारवाई करु असे आश्वासन प्राचार्यांनी दिले. तर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हुपरी पोलीस ठाणे, जनता शिक्षण प्रसारक मंडळ यांच्याकडे दोषी शिक्षिकेवर लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला. यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल हुपरीचे शहर मंत्री श्री अभिजीत माने, शहर संयोजक सागर मेथे, युवराज खराडे, शिवदास माने अभिजीत माने, प्रताप भोसले, प्रशांत साळुंखे, रवींद्र गायकवाड यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वसुंधरा शक्ती न्यूजसाठी हुपरीहून चिनू निंबाळकर

Post a Comment

Previous Post Next Post