पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा इचलकरंजी आयोजित नमो चषक विविध क्रीडा सांस्कृतिक 2024 स्पर्धेचे आयोजन प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष पै अमृत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा क्षेत्रात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या अंतर्गत आज रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये मुंबईसह इचलकरंजी, वडगाव, कोल्हापूर,सांगली, गडहिंग्लज, शिराळा कागल तालुक्यातील १६० स्पर्धकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थीसह खुल्या वर्गातील स्पर्धेमध्ये महिला स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. यावेळी प्रमुख पाहुण्या कामगार मंत्री सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सुविद्य पत्नी सौ सुमनताई सुरेश खाडे,व सौ निलीमाताई ओमप्रकाश दिवटे सौ रुपाताई उदय बुगड, भाग्यश्री वाळवेकर, यांच्यासह मान्यवर उपस्थित हस्ते विजेत्यांना बक्षीस घेऊन सन्मानित करण्यात आले शालेय गट प्रथम क्रमांक गौरी गवते, द्वितीय क्र. समृद्धी जाधव, तृतीय क्र.वैभवी पाटील खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला निलेश वेटे, द्वितीय क्र.सोमनाथ जाधव, तृतीय क्र. माया पसारे विजेत्यांना अनुक्रमे यांना शिल्ड व रोख ७०००/- ५०००/- ३०००/- बक्षीसे देण्यात आली तसेच स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या दिव्यांग श्रुती लाटकर या विद्यार्थिनीचा रोख बक्षीस देऊन सत्कार विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड, महिला आघाडी अध्यक्षा सौ अश्विनी कुबडगे, सौज्ञनीता भोसले सौ सुप्रिया मजले, सौ योगिता दाभोळे, सौ शबाना शहा,सौ ज्योती लाटणे,सौ आरती कडाले सुत्र संचालन हेमंत वरुटे यांनी केले राजू राजपुते उमाकांत दाभोळे महेश पाटील, उत्तमसिंग चव्हाण स्पर्धा संयोजक आशिष खंडेलवाल, मनोज तराळ, नितीन पडियार, कुमार शिंदे, श्रेयस गट्टानी, आदित्य पाटील, विपुल खोत, यश वायचळ, जीवक कांबळे राहुल गागडे, विजय कुरणे हेमंत थिटे, सौरभ सोनवले, प्रथमेश लाखे, विजय ढवळे, अभिषेक चिंचने, कृष्णा थाला म्हाळसाकांत कवडे, अभिषेक वाळवेकर भाजपा पदाधिकारी युवा मोर्चा, महिला कार्यकर्त्या,कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, विकसित भारत, आत्मनिर्भर भारत, चंद्रयान, स्वर्गीय माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम ,‘बेटी बचाव बेटी, पढाओ’, स्त्री भ्रूण हत्या, स्वच्छ भारत अभियान, जलसंवर्धन, निसर्गचित्र या समाजजागृती करणाऱ्या विषयांवर रांगोळी रेखाटन केले. अतिशय उत्साही वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पडली.
इचलकरंजीत नमो चषक 2024 सांस्कृतिक क्रीडा स्पर्धा अंतर्गत रांगोळी स्पर्धा संपन्न
byVijay Todkar
-
0