जागतिक महिला दिन आणि मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे औचित्य साधत महानगरपालिकेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या निर्देशानुसार हिरकणी कक्ष' स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचा शुभारंभ पायल माणगांवे आणि ऐश्वर्या गंगावणे या महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते आणि उपायुक्त तैमूर मुलाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. याचवेळी प्रामुख्याने महानगरपालिका आरोग्य विभाग तसेच इतर सर्व विभागाकडील महिलांसाठी आयोजित आरोग्य शिबीराचा शुभारंभ आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते करण्यात आला. या शिबिरात डॉ मिनल पडीया यांनी महिला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार रक्त तपासणी केली. याप्रसंगी सहा. आयुक्त विजय राजापुरे, मुख्य लेखाधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखापरीक्षक आरती खोत, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, आरोग्य अधिकारी डॉ.सुनीलदत्त संगेवार, महिला बाल विकास अधिकारी सीमा धुमाळ, उप अभियंता राधिका हावळ, सहा. लेखापाल किरण मगदूम, ग्रंथपाल बेबी नदाफ, विधी अधिकारी खदिजा सनदी, खरेदी पर्यवेक्षक शितल पाटील, यांच्यासह महानगरपालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.