भाजपच्या नवनियुक्त मंडल अध्यक्षांचा इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनतर्फे सत्कार

भाजपच्या नवनियुक्त मंडल अध्यक्षांचा इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनतर्फे सत्कार

भारतीय जनता पार्टी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील नवनियुक्त मंडल अध्यक्षपदी श्रीरंग शिवाजीराव खवरे (पूर्व मंडल), शशिकांत मोहीते (पश्चिम मंडल) व बाळासाहेब माने (ग्रामिण मंडल) यांची निवड झाल्यानंतर त्यांचा दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनतर्फे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष पाटील यांनी तीनही अध्यक्षांचे स्वागत करून त्यांच्याकडून इचलकरंजीच्या विकासासाठी भरीव काम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. वस्त्रोद्योग व यंत्रमाग व्यवसायाशी संबंधित स्थानिक समस्या सोडवण्यासाठी नवनियुक्त अध्यक्षांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी मांडली. सत्काराला उत्तर देताना पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहीते यांनी वस्त्रोद्योगाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत पाणी टंचाईसारख्या मूलभूत समस्यांवर उपाययोजना करण्याची ग्वाही दिली. भाजप पक्षवाढीसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाचे उमेदवार विजयी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच सत्कार केल्याबद्दल त्यांनी असोसिएशनचे आभार मानले. या प्रसंगी असोसिएशनचे उपाध्यक्ष रफिक खानापूरे, संचालक सतीश कोष्टी, सोमा वाळकुंजे, चंद्रकांत भोपळे, पांडुरंग सोलगे, सुभाष बलवान, राजाराम गिरी, प्राईड इंडिया टेक्सटाईल पार्कचे अध्यक्ष सुरेश आमाशे, उद्योजक सुकुमार देवमोरे, शिलकुमार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post