सीए परीक्षा उत्तीर्ण कुमारी प्रतीक्षा दामटेचा मथुरा शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार.

सीए परीक्षा उत्तीर्ण कुमारी प्रतीक्षा दामटेचा मथुरा शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार.

मथुरा शिक्षण संस्था, इचलकरंजी येथील शिपाई म्हणून कार्यरत असलेले श्री दामटे यांची पुतणी कुमारी प्रतीक्षा विठ्ठल दामटे हिने नुकतीच सीए (चार्टर्ड अकाउंटंट) परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. या उल्लेखनीय यशाबद्दल तिचा मथुरा शिक्षण संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. संस्थेचे कार्यवाह श्री.विवेक शेळके व संचालिका सौ.सुनंदा शेळके यांच्या हस्ते प्रतीक्षाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीकांत चव्हाण सर, आदींसह तीन्ही शाखेचे शिक्षक-शिक्षिका व कर्मचारीवर्ग उपस्थित होते. यावेळी संस्थेच्यावतीने प्रतीक्षाला पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

Previous Post Next Post