हिरेकुडी येथील परमपूज्य १०८ मुनीश्री कामकुमार नंदी महाराज यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. त्याचा बोरगांव येथे अखंड हिंदु जागृत संघटना यांच्यावतीने आज गावातील प्रमुख मार्गावरून मुक मोर्चा काढून मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी अखंड हिंदु जागृत संघटनेच्या वतीने करण्यात आली. साधू साध्वींच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. अशा घटना पुन्हा होऊ नये, त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने साधूंच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी ठोस उपाय योजना राबवावी, अशीही आज मागणी करण्यात आली. हिरेकुडी गावाच्या नंदी पर्वत आश्रमाचे जैन मुनि आचार्य श्री १०८ कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येने संपूर्ण जैन समाज दुखी झाला आहे. अहिंसेला प्राधान्य देणारा जैन समाज संपूर्ण मानव जातीला आदर्शवत आहे. अशा पवित्र जैन धर्मांच्या मुनिंच्या हत्या झाल्याने संपूर्ण अखंड हिंदु समाजामध्ये तीव्र आक्रोश आहे. या अत्यंत निंदनीय घटनेचा बोरगांव येथील अखंड हिंदु जागृत संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध करण्यात आला. कर्नाटक सरकारने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन हत्या करणाऱ्या दोषी आरोपींना कठोर शिक्षा करावी तसेच संशयीताना घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. पण कोणत्याही परिस्थितीत आरोपींची सुटका होऊ नये, अशा प्रमुख मागण्या आज मुक मोर्चात अखंड हिंदु जागृत संघटनेच्या वतीने करन्यात आला. या मुक मोर्चात युवकासह लहान मुला मुलींचा देखील मोठा सहभाग दिसत होता. यावेळी उल्हास निकम, उमेश वाक्सर, शिशिर सातपुते, गणेश वास्कर, अक्षय पवार, नितीन तोडकर, निलेश नाझरे, सुरेश मोहिते, रोहित पाटिल, राहुल वसवाडे, दीपक वाघमोडे, सचिन पांचांगे, उदय पोतदार, अनिल सुतार, सुशांत किल्लेदार, उदय पोतदार, तेजस पाटिल, शाम वास्कर, यशराज भोरे, राजु भिक्कु, अभिजीत शिंगे, वैभव नाजरे, दिलीप करविरे,अमित फाकांडे, अमित वास्कर यांच्यासह अन्य उपस्थित होते.
वसुंधरा शक्ती न्यूजसाठी
बोरगांव हून सुशांत किल्लेदार