इचलकरंजी येथील दातार मळा गल्ली नंबर दोन येथे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून इचलकरंजी महानगरपालिका याकडे कधी लक्ष देणार हा सवाल परिसरातील नागरिक विचारताना दिसत आहेत गेले कित्येक दिवस झाले गटरींची स्वच्छ झाली नाही.तर वेळच्यावेळी भागातील कचरा उठाव ही होत नसल्याने घाणीची साम्राज्य मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुणिया यासारखे आजार उद्भभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी भागात औषध फवारणी ही करण्यात यावी तसेच गेले चार-पाच दिवस झाले. दातार मळा परिसरातील पथदिवे बंद अवस्थेत आहेत यामुळे चोरीचे प्रकार होताना दिसत आहेत.तर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी फिरायला जाणाऱ्या नागरिकांवर परिसरातील मोकाट कुत्रे हल्ला करत आहेत. आशा मोकाट कुत्र्यांचा ही बंदोबस्त करण्यात यावा.अशी मागणी भागातील नागरिक करत आहेत. तरी आयुक्तांनी या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन दातार मळा परीसराती नागरिकांच्या समस्यांचा निपटारा करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांच्यातून होत आहे.
Tags
स्थानिक बातम्या