ध्येयाने प्रेरित होऊन यशस्वीतेकडे वाटचाल करा – श्री.प्रकाश पोटे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

ध्येयाने प्रेरित होऊन यशस्वीतेकडे वाटचाल करा – श्री.प्रकाश पोटे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

पुणे येथील जी.एस.टी.कमिशनर आणि रा.छ. शाहू हायस्कूलचे सन्मानीय माजी विद्यार्थी श्री. प्रकाश पोटे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून “ध्येयाने प्रेरित होऊन कठोर परिश्रम करा. अंतर्मन आणि बाह्यमन यांची एकात्मता साधून यशस्वी व्हा,” असे मार्गदर्शन केले. श्री. विकास खारगे (अप्पर मुख्य सचिव, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘रा.छ. शाहू महाराज विद्यार्थी विकास मंच’, ‘दहावी अभ्यासगट’, ‘शाहू हायस्कूल माजी विद्यार्थी संघ’ व रा.छ. शाहू हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेतील हे दुसरे पुष्प होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री.शंकर पोवार यांनी केले. पाहुण्यांची ओळख श्री.सुनील मांगलेकर यांनी करून दिली. श्री. पी.ए.पाटील सर यांनी संयोजन केले तर श्री. राजू नदाफ यांनी आभार मानले. या कार्यक्रमास माजी विद्यार्थी श्री. वसंत सपकाळे, महेश खांडेकर, महेश पुजारी, मारुती जाधव, जाफर जिडगे, नेताजी बिरंजे, किरण सातपुते, कमलाकर सातपुते, अशोक खोत, विजय हावळ, श्रीहरी कामत, सुखदेव कोल्हापूरे, अनिल पाटील, मोहन शेळके, अनिल अलासकर आदींसह शाळेचे शिक्षकवृंद सौ.ढोले, पी.जी. पाटील, तुषार जगताप, स्नेहा आवटे, कादंबरी चव्हाण, कु.श्वेता, जगताप, काळे, पी.एल. पाटील उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post