जनसेवा समाज सेवक नरसू शिंदे सामाजिक संस्थेचा महिला रोजगार मार्गदर्शक मेळावा उत्साहात संपन्न

जनसेवा समाज सेवक नरसू शिंदे सामाजिक संस्थेचा महिला रोजगार मार्गदर्शक मेळावा उत्साहात संपन्न

कोळींद्रे (ता.आजरा) जनसेवा समाज सेवक नरसू शिंदे सामाजिक संस्थेच्या वतीने दिनांक १५ मे २०२५ रोजी कोळींद्रे येथे महिलांसाठी रोजगार मार्गदर्शक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचा प्रमुख उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे व त्यांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत करणे हा होता. या मेळाव्यात आजरा तालुक्याचे शांताराम कांबळे यांनी कुटीर उद्योग व बचत गटांच्या महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली. तर आर. वाय. पाटील यांनी महिलांना स्वावलंबी कसे बनता येईल याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तर सदर कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिव वक्ते अखलाखभाई मुजावर, कोल्हापूर जिल्हा शिव उद्योग संघटनेच्या प्रमुख सौ.गीता जेधे, जिल्हा संघटक महेश लाखे, सौ.लता रेडेकर (अंकिता उद्योग समूह), तालुका संघ संचालक जयराम संकपाळ, ग्रामपंचायत सदस्य भिकाजी गोंधळी व पत्रकार महादेव कुडव यांची उपस्थिती होती. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश बुगडे सर यांनी केले. तर विशेष सहकार्य सुशांत नाईक, विठ्ठल आळवणे, सुदाम हरेर, रवींद्र शिंदे, राकेश शिंदे, सुनील नारळकर व नागोजी पोटे, आनंदा सुतार, सुधाकर घोरपडे, कुणाल राजाराम, शिवाजी भगुद्रे, अमर मटकर, जयश्री सावंत, संतोष सुतार, शंकर सावंत, महादेव हुडगे, अरूण शिंदे, राणूजी पाटील, आण्णा सुतार, अशोक पाटील यांनी केले. हा उपक्रम महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक सकारात्मक पाऊल ठरला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post