शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन, 5 एप्रिल रोजी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य कुस्ती मैदान
शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या 15 मार्च रोजी साजरा होणाऱ्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख भाऊसाहेब आवळे यांनी दिली आहे.विविध उपक्रमांनी साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने येथील व्यंकोबा मैदानात शनिवार ता. 5 एप्रिल रोजी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मल्लांची भव्य कुस्ती दंगल शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री प्रकाश आबिटकर,वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री दिपक केसरकर,खासदार श्रीकांत शिंदे, माजी मंत्री सतेज पाटील,खासदार धैर्यशील माने यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.कुस्ती मैदानाचे नियोजन उपमहाराष्ट्र केसरी पै.अमृत भोसले करत आहेत. त्याचबरोबर 15 मार्च रोजी इचलकरंजी शहर शिवसेनेच्यावतीने तोरणानगर येथील अनाथ आश्रमात मुलांना खाऊ वाटप, किल्ले पन्हाळा येथे शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक ,शाहूवाडी येथे शिवसेनेच्या वतीने वकृत्व स्पर्धा ,अब्दुल लाट तालुका शिरोळ येथे शिवसेनेच्या वतीने अनाथ आश्रमातील मुलांना खाऊ वाटप, जयसिंगपूर येथे शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबिर, हातकणंगले येथे शिवसेनेच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप,वडगाव येथे शिवसेनेच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात आरोग्य शिबिर तर इचलकरंजी येथे युवासेना व महिला आघाडी यांच्या वतीने मूकबधिर शाळेत मुलाना व IGM हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सर्व सामाजिक उपक्रमात नागरिकांनी उस्फुर्तपणे आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन शहर प्रमुख भाऊसाहेब आवळे यांनी केले आहे हे सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी मतदार संघातील सर्व शिवसैनिक परिश्रम घेत असल्याचेही त्यांनी सांगितले