लाटवडे गावच्या सर्वांगीण विकासासाठी व नागनाथ महादेव मंदिरासाठी लागेल ते सहकार्य करू - आमदार विनय कोरे

लाटवडे गावच्या सर्वांगीण विकासासाठी व नागनाथ महादेव मंदिरासाठी लागेल ते सहकार्य करू - आमदार विनय कोरे 



लाटवडे गावच्या सर्वांगीण विकासासाठी जनस्वुराज पक्षाचे आमदार डॉ.अशोकरावजी माने व जनस्वुराज्य चामाध्यमातून आपण लागेल ते सहकार्य करू अशी आश्वासन जनस्वुराज पक्षाचे प्रमुख आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी दिले लाठवडे ग्रामस्थांच्यावतीने व माजी उपसरपंच किरण माळी यांच्या उपस्थितीत आमदार विनय कोरे यांची पुन्हा एकदा आमदार पदि निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार लाटवडे ग्रामस्थांच्या वतीने वारणानगर येथे करण्यात आला. यावेळी विरशैव लिंगायत समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आपण लागेल ते सहकार्य करू असे आश्वासन आमदार विनय कोरे यांनी लाटवडे येथील ग्रामस्थांना दिले यावेळी लाटवडे येथील ग्रामस्थ, तसेच वीरशैव लिंगायत समाजाचे सर्व कार्यकर्ते तसेच तानाजी स्वामी, सावता माळी, रत्नाकर माळी, विकास माळी, संभाजी माळी, पोपट माळी, जयसिंग स्वामी, शंकर चव्हाण, शहाजी कांबळे, सुनील जंगम वैभव माळी,अतुल माळी, मानीक माळी, अशोक माळी, भिमराव माळी, सुरज माळी विश्वजीत माळी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक मा.उपसरपंच किरण माळी यांनी केले.

वसुंधरा शक्ती न्यूजसाठी- विनोद शिंगे

Post a Comment

Previous Post Next Post