समाजसेवक नरसु शिंदे यांच्या स्वखर्चातून ग्रामीण भागातील 2 हजार महिलांना गावरान कोंबड्यांचे वितरण

समाजसेवक नरसु शिंदे यांच्या स्वखर्चातून ग्रामीण भागातील 2 हजार महिलांना गावरान कोंबड्यांचे वितरण

कुळींद्रे येथील समाजसेवक नरसू शिंदे यांच्यावतीने ग्रामीण भागातील 2 हजार महिलांना स्वखर्चातून गावरान कोंबड्यांचे वितरण करण्यात आले ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी समाजसेवक नरसू शिंदे यांनी  हा सामाजिक उपक्रम राबवला यामध्ये महिलांना गावरान कुकुटपालन व्यवसाय म्हणजेच मिनी पोल्ट्री व्यवसाय सुरू करून दिला आहे. ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भर होऊन स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणून हा व्यवसाय सुरू करून दिला असल्याचे समाजसेवक नरसू शिंदे यांनी सांगितले या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पत्रकार पुंडलिक सुतार सामाजिक कार्यकर्ते सुनील दळवी, माजी सरपंच रेखा जाधव, जयश्री सावंत आनंदा सुतार, भिकाजी गोंधळी ,संतराम कुऱ्हाडे, प्राचार्य सुरेश बुगडे, शरद पाटील, रमेश कांबळे, पांडुरंग कांबळे, शिवाजी बघूद्रे, सुधाकर घोरपडे, सुरेश गवळी आदींसह भागातील महिला ग्रामसस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post