परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार डॉ.सुजित मिणचेकर यांची विजयाकडे वाटचाल ; प्रचारात योग्य नियोजन व अचूकता

परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार डॉ.सुजित मिणचेकर यांची विजयाकडे वाटचाल ; प्रचारात योग्य नियोजन व अचूकता 


हातकणंगले विधानसभा मतदार संघाच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात परिवर्तन महाशक्ती आघाडी पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार डॉक्टर सुजित मिणचेकर यांनी प्रचारात गरुड भरारी घेतली आहे. सुरुवातीपासून त्यांनी प्रचारात नेटके नियोजन ठेवले असून गावोगावी वैयक्तिक भेटीगाठी, पदयात्रांवर भर दिला आहे. विधानसभा निवडणुकीचा त्यांना पंधरा वर्षाचा अनुभव असून ते दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. गेल्या बावीस वर्षापासून ठाकरे घराण्याशी व शिवसेनेशी ते एकनिष्ठ आहेत. ह्या अनुभवाचा त्यांनी पुरेपूर फायदा उठवत प्रचाराची रणनीती आखली आहे. दहा वर्षे आमदारकीच्या कालावधीमध्ये त्यांनी गावोगावी केलेली विकासकामे ही त्यांची जमेची बाजू आहे. कोणालाही तोडून बोलण्याचा त्यांचा स्वभाव नसल्यामुळे बावीस वर्षात जोडलेले मित्र , कार्यकर्ते व काही कुटुंबेही त्यांच्या प्रचारात सामील झाली आहेत. प्रत्येक गावात  त्यांना मानणारा वेगळा वर्ग आहे. मतदार संघातील शिक्षक, डॉक्टर व सामान्य गरीबांपासून ते श्रीमंतापर्यंतचा सर्व वर्ग त्यांच्या पाठीमागे असून स्वतःउच्चशिक्षित असल्यामुळे काही सुशिक्षितचे वर्ग त्यांना साथ देत आहे. प्रचारातील नियोजन, सुसूत्रता व अचूकता या कारणांमुळे गेल्या पंधरा दिवसात त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्यात रोजच्यारोज वाढ होत आहे . त्यांनी जबाबदार कार्यकर्त्यांकडे प्रचाराच्या कामांचे नियोजन दिले असून वैयक्तीक अधिकार दिल्यामुळे प्रचारात कोणतीही कुचराई राहिलेली नाही. त्यामुळे त्यांची यशाकडे वाटचाल सुरू असून त्यांचा विजय निश्चित असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post