क्रीडा व शालेय जीवनात यश मिळवण्यासाठी मोबाईल पासून दूर राहणे गरजेचे- पै.अमृतमामा भोसले

क्रीडा व शालेय जीवनात यश मिळवण्यासाठी मोबाईल पासून दूर राहणे गरजेचे- पै.अमृतमामा भोसले 



विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विकास विद्यामंदिर व चौगुले बालवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक क्रीडा महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन भारतीय जनता पार्टी इचलकरंजीचे शहराध्यक्ष पै. अमृतमामा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच त्यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धांना आरंभ करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी क्रीडा व शालेय जीवनात यश मिळवण्यासाठी मोबाईल पासून दूर राहणे गरजेचे आहे असे नमूद केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष विकास चौगुले यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये संस्कार, व्यायाम व कष्ट यांना खूप महत्त्व आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सपना मेळवंकी मॅडम यांनी केले. यावेळी शाळेचे मार्गदर्शक दत्तात्रय देसाई ,शिवानंद रावळ ,संचालक यश चौगुले, अक्षय चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत नेजकर यांनी केले व आभार जागृती खामकर यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post