कबनूरच्या विकासात्मक कायापालटसाठी राहुल आवाडे यांना विजयी करा ; सौ.मौश्मी आवाडे
कबनूर गावच्या विकासासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी सातत्याने विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यातूनच गावाचा सर्वांगिण विकास होत आहे. अशाच विकासात्मक कामांतून गावाचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना विजयी करुन राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत येण्यासाठी साथ द्यावी, असे आवाहन सौ. मौश्मी आवाडे यांनी केले. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ कबनूर येथील आवळे चौक येथे संपन्न कॉर्नर सभेत सौ. मोश्मी आवाडे बोलत होत्या. यावेळी सरपंच सौ. सुलोचना कट्टी यांनी, आमदार प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून कबनूर गावासाठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध करुन दिल्याचे सांगत या निधीतून गावात अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. अनेक प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करुन रखडलेली कामे पूर्ण झाली आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा करत असताना नळ कनेक्शनसाठी एकाही ग्रामस्थाला आर्थिक झळ बसू दिली नाही. आवाडे यांच्या प्रयत्नातून प्रत्येक घरात मोफत नळजोडणी करण्यात आली आहे. अशीच विकासगंगा वाहती राहण्यासाठी कबनूरकर राहुल आवाडे यांच्या पाठीशी राहतील आणि प्रचंड मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास दिला. यावेळी ज्येष्ठ नेते बी. डी. पाटील, पंचगंगा कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील, माजी उपसरपंच निलेश पाटील यांची भाषणे झाली. स्वागत माजी सरपंच मधुकर मणेरे यांनी तर सूत्रसंचालन संजय कट्टी यांनी केले. याप्रसंगी उपसरपंच सुधीर लिगाडे, माजी जिल्हा परिषद सदस्या विजया पाटील, माजी पंचायत सभापती रेश्मा सनदी, माजी तालुका पंचायत सदस्य महानंदा कांबळे, अर्चना पाटील, प्रा. अशोक कांबळे, जयश्री जाधव, माजी सरपंच शोभा पोवार, जवाहर बँकेचे संचालक बबन केटकाळे, ग्रामपंचायत सदस्य समीर जमादार, अर्चना पाटील, वैशाली कदम, किशोर पाटील, अपेक्षा कांबळे, अजित खुडे, बाळू कामत, मनोज जाधव, सोमाजी कांबळे, तानाजी आवळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, भाजपा महायुतीचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.