भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा ; सौ.मौश्मी आवाडे
संपूर्ण इचलकरंजी शहरासह मतदारसंघाचा विशेषत: ग्रामीण भागाचा विकासात्मक कायापालट करायचा असेल तर राज्यात गतीमान महायुतीचे सरकार गरजेचे आहे. आणि युतीची सत्ता येण्यासाठी भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन सौ. मौश्मी आवाडे यांनी पंचगंगा कॉलनी, वाकरेकर मळा परिसरात संपर्क दौर्यावेळी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या हातकणंगले तालुका अध्यक्षा अनुराधा बाळकृष्ण पाटील यांच्या निवासस्थानी बैठकही घेण्यात आली. महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ संपर्क दौरा, पदयात्रा, कॉर्नर सभा, जाहीर मेळावे आदींच्या माध्यमातून भाग अन् भाग पिंजून काढला जात आहेत. त्याच अनुषंगाने सौ. मौश्मी आवाडे यांनी पंचगंगा कॉलनी, वाकरेकर मळा या कबनूर भागात संपर्क दौरा केला. या परिसरातील महिलांशी मौश्मी आवाडे यांनी प्रत्यक्ष गाठीभेटी करत भागातील समस्या जाणून घेतानाच सर्व प्रलंबित प्रश्नांसह सर्वांगिण विकासासाठी राहुल आवाडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन केले. तर सौ. अनुराधा पाटील यांनीही परिसरातील सर्वच महिला राहुल आवाडे यांना मताधिक्य देतील, अशी ग्वाही दिली.याप्रसंगी बाळकृष्ण पाटील, कबनूरचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुधीर पाटील, यशवंत चव्हाण, सुभाष पाटील, सुजाता कोरे, सोनाली सरूडकर आदींसह भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.