राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा विजयी निर्धार मेळावा

राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा विजयी निर्धार मेळावा 


इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ जिव्हाजी हॉल येथे सोमेश्वर वाघमोडे, सुनील पाटील, राजू बोंद्रे, बाळासो ओझा, मोहन काळे, दिपक (आप्पा) रावळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा विजयी निर्धार मेळावा संपन्न झाला.या मेळाव्याचा उद्देश केवळ महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ नव्हे, तर हिंदुत्वाच्या विचारधारेच्या प्रसारासाठी एकजुटीचे वातावरण निर्माण करणे होता. या मेळाव्यात महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाची व महायुतीच्या विचारधारेची महती समजावून सांगणारे भाषणं दिली गेली. या मेळाव्याच्या आपले राजकीय दृष्टिकोन, इचलकरंजी विधानसभा क्षेत्रातील विकासात्मक योजना आणि हिंदुत्वाचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी प्रशांत रोठे, अवधूत सुतार, मनोज जाधव, सुनील काडाप्पा, किशोर पाटील, विनायक काळे, राजू हाणबर यांच्यासह सर्व जनसमुदायन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post